आरोग्य

बहु्गुणी बडिशेपचे आरोग्यवर्धक फायदे पहा

1) उत्तम औषध

रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते (जेवणानंतरच खावी). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.

२) पोटात गॅस

पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा, आमांश दूर करते.

3) अपचनाच्या तक्रारी

बडिशेपचा काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.

४) मुलांना दात येताना

जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.

५) भूक लागत नसेल

रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.

६) स्मरणशक्ती

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण + तूप, चाटण द्यावे.

७) तापामध्ये अंगाची आग होणे

जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.

८) मासिक पाळी

पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी.

९) लघवी कमी होणे

लघवी कमी होत असेल, तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.

१०) उलट्या होणे

अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.

११) कोरडा खोकला

एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.

१२) सूज व वेदना

बडिशेप, सैंधव पूड, ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.

१३) सरबत

बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते. या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते, शिवाय ते पौष्टिक आहे.

१४) विरेचन चूर्ण

बडिशेप, ज्येष्ठमध, सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी, म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्या सोबत घ्यावे. त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.

१५) एनर्जी ड्रिंक

बडिशेप एक चमचा, एका वेलची दाणे, दोन खजुराच्या आठळ्या (बिया काढाव्यात). हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सर मधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago