Shikrapur Police Station
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर जुना टोलनाका परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या प्रदीप भाऊसाहेब सावंत व सीताराम येरय्या स्वामी या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस नाईक रोहिदास पारखे व लखन शिरसकर हे रात्रगस्त घालत असताना त्यांना चाकण रोड येथील जुना टोलनाका येथे दोन संशयित युवक झाडाच्या आडोशाला लपल्याचे दिसून आले. मात्र ते पळून लावू लागले दरम्यान पोलिसांनी त्याला पकडत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले यावेळी ते दोघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत पोलीस शिपाई लखन जनार्दन शिरसकर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब सावंत (वय ३२) रा. जातेगाव फाटा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. होळ ता. केज जि. बीड व सीताराम येरय्या स्वामी (वय ३२) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कीर्तीनगर अक्कलकोट रोड सोलापूर या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना त्याला अटक केली. यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक विद्युत मोटार चोरल्याचे समोर आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…