आरोग्य

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

पावसाळा सुरु होताच, सोबत येते विविध आजाराची साथ. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसते. कोरोनातून काहीसा दिलासा मिळत असतानाच, आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हा डेंग्यू कसा होतो. त्यापासून कसा बचाव करावा, याबाबत जाणून घेऊ या..

डेंग्यू म्हणजे नेमक काय?
रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यान डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत असते. प्रामुख्यानं NS-1, Igm आणि IGG या तीन चाचण्यांतून डेंग्यूच निदान होते.

डेंग्यूची प्रमुख लक्षणे
▪️ अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, हाड आणि प्रामुख्यान सांध्यांमध्ये वेदना होण.
▪️ शरीरावर पुरळ येणं, नाकातून किंवा दातातून, लघवीद्वारे लक्षणं दिसल्यास हा प्रकार गंभीर आहे, अस समजाव.

उपचार आणि काळजी
▪️ डेंग्यूवर ठराविक उपचार वा औषध उपलब्ध नाही पण वेळीच उपचार झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविता येते.
▪️ रुग्णाला लक्षणांनुसार औषध दिली जातात. ताप किंवा अंगदुखीवर औषध दिली जातात.
▪️ रुग्णाने विश्रांती घेणे ही सर्वांत गरजेचे, तसेच भरपूर पाणी प्यावे, साधा आहार घ्यावा.
▪️ शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.

डेंग्यूच्या अळींचा अटकाव
▪️ परिसर स्वच्छ असणे, सर्वात महत्त्वाचं आहे.
▪️ घरात एसी, फ्रीजखाली पाणी साचू देऊ नका
▪️ परिसरात, घरावर पावसाचे पाणी साचू देऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago