शिरूर तालुका

शिक्षण आयुक्त कार्यालयात शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा

शिक्रापूर: राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित असून सदर प्रश्नांवर शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनेचे व शिक्षण आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे ठरले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपायुक्त हरुण आत्तार, शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ, अधीक्षक कृष्णा डहाळे, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे समन्वयक दादासाहेब गवारे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे समन्वयक दादासाहेब गवारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली तर शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांनी प्रशासकीय कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

दरम्यान शिक्षकांचे पेंडीग पगारबीले, फरक बिले, पी. एफ. स्लीपा व पी. एफ. प्रकरणे, मेडिकल बीले, सेवानिवृत्तांची विविध पेंडींग बीले, शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व सेवकांची नावे समाविष्ट करणे, अनुकंपाखालील पदे भरणे व मान्यता देणे, शिक्षक व सेवकांची पदोन्नती, शिक्षक सेवकांची रिक्त पदे भरणे, वैयक्तिक मान्यता देणे. यांसह आदी विषयांवर सविस्तर चर्चा होत तातडीने उपाययोजना करण्याचे ठरले. तसेच पुणे जिल्हा भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याने कडक उपाययोजना करण्याची सुचना वरिष्ठांना करण्यात आली असून प्रशासनाने दखल घेऊन ठोस पाउले उचलण्याचे मान्य केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

37 मिनिटे ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

22 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago