Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

क्राईम

शिरुर (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्यावरुन वाद झाल्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे देविदास राधुजी पोटे (वय ५६, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. १) किशोर बाबुराव पतके, २) पुजा किशोर पतके, ३) सानिका किशोर पतके, ४) सविता जगदाळे. ५) सविता संजय कदम. ६) लीलाबाई रावसाहेब मोतीमोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (ता १८) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी देविदास पोटे व किशोर पतके यांच्यात मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला. यावेळी किशोर पतके याने जमाव जमवत पोटे यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांसह शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी निमोणे येथे भेट दिली आहे. शिरुर पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघासाठी आपली पसंती कोणाला?

View Results

Loading ... Loading ...

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

नागरिकांची करमणूक! शिरूर तालुक्यात गुन्ह घडला मजेशीर आणि तपासही तेवढाच गंभीर…

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन…

शिरूर-हवेली मतदार संघामधून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?

View Results

Loading ... Loading ...