क्राईम

शिरूर तालुक्यात कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी…

न्हावरे (तेजस फडके): शिरुर-चौफुला रस्त्यावर १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वा च्या सुमारास न्हावरे (ता.शिरुर) गावच्या हद्दीत न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या व्यक्तीस धडक दिली. या घटनेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८, रा. न्हावरे ता. शिरूर, जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर चालक पळून गेल्याने नितीन दत्तात्रेय हांडे (वय ३२) यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ शिरुर बाजुकडुन भरधाव वेगाने आलेला कंटेनर क्रं एन एल ०१ ए जी ३६५७ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या कडेने पायी चाललेले विठ्ठल नारायण निंबाळकर यांना पाठीमागून धडक बसल्याने अपघात होवून अपघातात त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर कंटेनर चालक पळुन गेल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे नितीन दत्तात्रेय हांडे यांनी फिर्याद दाखल केल्याने अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार जाधव हे करत आहेत.

शिरूर! तू येथे आईच्या घरी राहायचे नाही असे दोघे म्हणाले अन्…

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…

शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

6 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

9 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

19 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

25 मिनिटे ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

28 मिनिटे ago

‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठाचा राज्यभर विस्तार; ३१ लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ

एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची…

33 मिनिटे ago