मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन टाकवे (ता.मावळ, जि.पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) या परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलीला आरोपीने तिच्या घराजवळुन लग्नाचे अमिष दाखवत त्याने आणलेल्या चारचाकी वाहनातुन तो राहत असलेल्या टाकवे (ता. मावळ जि.पुणे) या ठिकाणी घेवुन गेला. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास इतर लोक कामवर गेले असताना पिडीत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधुन लग्नाचे आमिष दाखवत “अभी आपण दोनो शादी करणेही वाले है तो क्या प्रॉब्लेम है” असे म्हणत फिर्यादीच्या संमतीशिवाय तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

 

त्यामुळे पिडीत अल्पवयीन मुलीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) याच्या विरुध्द फिर्याद दिली असल्याने बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडल्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी एक तासात आरोपीला अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले असता आरोपीला सोमवार दि ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिरूर तालुक्यात कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

शिरूर! तू येथे आईच्या घरी राहायचे नाही असे दोघे म्हणाले अन्

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

13 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

13 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

13 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

17 तास ago