crime

शिरूर! तू येथे आईच्या घरी राहायचे नाही असे दोघे म्हणाले अन्…

क्राईम

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील इंदिरानगर येथील गौरी अविनाश रंदवे (वय २२) या महिलेला तिचा मामा विजय नानुभाऊ रंधवे व मामाची मुलगी मयुरी विजय रंधवे यांनी ‘तू येथे आईच्या घरी राहायचे नाही’, असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली. हाताला रस्त्यावर ओढत नेऊन वीट फेकून मारली आहे. याप्रकरणी मामा व मामाच्या मुलीवर शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २६ सप्टेंबर रोजी ०९:३० वाजण्याच्या सुमारास इद्रायणीनगर (शिरूर) येथे गौरी अविनाश रंदवे या आईची घरी असताना मामा विजय त्याची मुलगी मयुरी विजय रणदिवे हे दोघे आले. गौरी रंदवे व आई अनिता यांना येथे राहायचे नाही, असे म्हणून हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. हाताला धरून रस्तावर ओढत नेवून विट फेकुन मारूली आहे. तसेच येथे राहिले तर जिवेमारून टाकीन अशी धमकी देवुन शिवीगाळ केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी विजय नानुभाऊ रणदिवे व मयुरी विजय रणदिवे (दोघे रा. इंद्रायणीनगर, शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार टेंगले हे करीत आहे.

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही…

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…