क्राईम

मनपा ते तळेगाव ढमढेरे PMPML बस चालकाने प्रवाशाला केली बेल्टने मारहाण…

शिक्रापूर : मनपा ते तळेगाव ढमढेरे या PMPML बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ घडली आहे. या मारहणीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिक्रापूरमधील चाकण चौकात बस चालकाने बस थांबवून खाली उतरून प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. यावेळी काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. चालक हा बस चालवताना देखील अस्वस्थ असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. या प्रकारामुळे पीएमपीएमएल चालकांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांना मारहाण झाल्याने सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बस चालका प्रवाशाला मारहाण करत असताना उपस्थितांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला आहे. बसच्या कंडाक्टरने मारहाण होत असताना चालकाला आवरण्याचा प्रयत्न केला. शिवाय, उपस्थितांनीही रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, बसच्या चालकाने मारहाण सुरूच ठेवली होती. बसचालक बस चालवत असताना वेगाने चालवत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा झाली. शिवाय, बघ्यांची गर्दी झाली होती. बस चालकावर काय कारवाई होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिक्रापूर! पुणे महामार्गावर दारुड्या युवकाने घातला मोठा धिंगाणा…

शिरूर! कंपनीच्या गेटवरच कामगाराचा मृतदेह ठेवून आंदोलन…

अपघाताचा थरार! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर कंटेनरने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं…

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

Video; शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गावर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago