शिक्रापूर: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरने दहा ते बारा गाड्यांना जोरात धडक दिली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले. कंटेनरसह पळून जाण्याच्या प्रयत्नात चालक भरधाव वेगात निघाला होता. त्या भीतीपोटी तो सुसाट वेगाने पळ काढू लागला. काही अंतरावर त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली. त्यानंतर चाकण पोलिसांनी पाठलाग सुरु केला, हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला. वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता. पुढे शिक्रापूर पोलिसांची गाडी त्याला रोखण्यासाठी थांबली होती. मात्र, कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला ही धडक दिली. यात ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाला आहे. चाकण ते जातेगाव या वीस किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली.
अपघाताने मोठा गदारोळ निर्माण झाला, अखेर नागरिकांनी कंटेनरला रोखले आणि चालकाला खाली खेचून बेदम चोप दिला. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आला आहे.
अपघातात अनेक जण जखमी ही झाले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…
सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…
Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी
तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…
केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी