Video; शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गावर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी पुणे-नगर महामार्गालगतच सोडण्यात येत असुन त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत कारेगाव ग्रामपंचायत असल्याने औद्योगिक वसाहतीतुन मोठया प्रमाणात या ग्रामपंचायतला कर मिळतो. गावात अंतर्गत गटार लाईनचे काम झालेले आहे. परंतु या गटार लाईनचे आउटलेट कारेगाव ग्रामपंचायतचे थेट पुणे-नगर महामार्गावर सोडले आहे.

त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाशांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे मोठया प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे कारेगाव ग्रामपंचायतने हे सांडपाणी रस्त्यावर सोडू नये अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्यावरुन रात्रीच्या वेळेस नगरकडुन पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे अनेकवेळा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

 

गटार लाईनसाठी लाखों रुपयांचा चुराडा, तरीही सांडपाणी रस्त्यावर…

कारेगाव मध्ये गेल्या चार वर्षात करोडो रुपयांची विकासकामे करण्यात आली. त्यात गावातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी लाखों रुपये खर्चून गटारलाईनचे काम करण्यात आले. मात्र लाखों रुपयांचा चुराडा होऊनही गावातले सांडपाणी मात्र पुणे-नगर महामार्गावर सोडण्यात आले. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मात्र जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

 

आम्ही पुणे-नगर महामार्ग खोदुन सांडपाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेऊन सोडणार आहोत. परंतु संबंधित खात्याने आम्हाला पाईनलाईन क्रॉसिंगची अजुन परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कारेगावचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परंतु जोपर्यंत आम्हाला पाईनलाईन क्रॉसिंगची परवानगी मिळत नाही. तोपर्यंत आम्ही सांडपाणी रस्त्यावर येणार नाही. यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करणार आहोत.

किसन बिबे (ग्रामविकास अधिकारी)

कारेगाव ग्रामपंचायत 

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

शिरुर; चार वर्षात सरपंच फक्त नामधारी ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या ‘महाशयां’ चीचं लुडबुड…?

शिरुर; कारभारणीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमागचा ‘आका’ नक्की कोण…?