shikrapur-trinity-company
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक कंपनीत कायमस्वरूपी असलेल्या रामपाल दुशद या कामागाराचा मृत्यू झाला. याबाबत कंपनीला जबाबदार ठरवून नातेवाइक व अन्य कामगारांकडून मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवून रविवारी (ता.२२) निषेध आंदोलन करण्यात आले.
ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक कंपनीत कायमस्वरूपी कामगार असलेला रामपालची प्रकृती सोमवारी सकाळी अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी रुग्णायलात नेण्यासाठी कंपनीकडे रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णालयात नेण्यास एक तास उशीर झाल्याने प्रकृती गंभीर झाली. खासगी रुग्णवाहिकेकडून उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यात आले. तेथे शनिवारी (ता.२१) त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइक व कामगारांनी रामपालचा मृतदेह थेट कंपनीच्या गेटवर आणून आंदोलन सुरू केले.
शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, संदीप कारंडे, दामोदर होळकर, पल्लवी वाघोले यांनी घटनास्थळी जाऊन कामगार व नातेवाइकांशी चर्चा केली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह हलवून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिक्रापूर! पुणे महामार्गावर दारुड्या युवकाने घातला मोठा धिंगाणा…
शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल…
रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…