क्राईम

शिरूर तालुक्यात जबरी चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या दोन तासात बेडया…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरूर) येथील एका हॉटेलमध्ये घुसून वेटरला मारहाण करून गल्ल्यातील रोकड लंपास केलेल्या जबरी चोरीतील दोन आरोपींना टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस ऊपनिरीक्षक सुनिल ऊगले, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने हालचाल करून दोन तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, १५ मार्च रोजी रात्री ०१:०० वा. चे सुमारास हॉटेल बंद झाल्यानंतर विसावा हॉटेल पंचतळे येथे हॉटेलचे मुख्य गेट बंद करून वेटर संदिप भोईर हे वस्ताद आनंद सिंह व बंटी सिंग हे झोपले होते. कृष्णा गुंजाळ व प्रशांत शिरसाठ हे हॉटेलच्या पाठीमागील कंम्पाउंडवरून उडी मारून हॉटेलमध्ये शिरले व गेट वाजवले तरी का उघडले नाही? अशी विचारणा करून शिवीगाळ करू लागले.

सदर वेळी त्यातील एकाने खाली पडलेल्याच मोठ्या लोखंडी उलातण्याने संदिप भोईर याला मारायला सुरवात केली. दरम्यानच त्यातील एकाने त्याला खाली पडून धरले व दुसऱ्याने त्याच्या खिशातील ७,३०० रुपये बळजबरीने काढून घेतले. ही मारामारी सोडवणा-या वस्ताद आनंद सिंह व बंटी सिंग यांनाही त्या दोघांनी हाताने मारहाण केली. तसेच हॉटेल मालक निलेश पळसकर व मॅनेजर हरिष चोरे यांना तुम्हाला आमचे काय वाकडे करायचे ते करा आम्ही कोणालाही घाबरत नाही अशी शिवीगाळ करून निघून गेले होते. या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे अधिक तपास करत होते. तपासादरम्यान त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पंचतळे परीसरातील जांबुत, पिंपरखेड, चांडोह या भागात कोणी कोणत्याही व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळून खंडणी मागत असेल अगर त्रास देत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा. तात्काळ दखल घेऊन कठोरात कठोर कारवाई केली जाईल. माहीती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवली जाईल, असे आवाहन टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस ऊपनिरीक्षक सुनिल ऊगले यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

19 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago