शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या राहतात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी जवळच्या नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत असल्याबाबतचे सांगून गळफास घेतला, काही वेळातच सदर ठिकाणी युवक गेले असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये नेले असतात तेथील डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय ३4) रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर चा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर जितेंद्र मांडगे यांनी वैयक्तिक टेन्शन मधून गळफास घेतला असल्याचे बोलले जात असून पोलीस वर्तुळात सदर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…