क्राईम

शिरूर तालुक्यात हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा…

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) : शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील शेवाळे वस्ती परिसरात सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या अड्ड्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) धडक कारवाई करत मोठा साठा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निमगाव भोगी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती परिसरात गावठी हातभट्टी दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी निलेश लोंढे हा मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारु तयार करताना आढळून आला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका मोठ्या खड्ड्यात साठवून ठेवलेले सुमारे ५०० लिटर कच्चे रसायन, तसेच २०० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू जप्त केली. याशिवाय घटनास्थळी असलेली एम एच १२ पी एन ३६३४ क्रमांकाची अल्टो कार देखील ताब्यात घेण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले दारु निर्मितीसाठी लागणारे कच्चे रसायन, साहित्य व हातभट्टीचे अवशेष दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले. त्यामुळे परिसरात सुरू असलेला बेकायदेशीर दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

आरोपीवर यापूर्वीही दारुबंदी कायद्याचे गुन्हे…
या कारवाईत अटक करण्यात आलेला निलेश लोंढे हा पोलिसांच्या नजरेत नवीन नसल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वीही रांजणगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. २०२२ आणि २०२३ मध्ये त्याच्यावर दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हे नोंद झाले होते. त्यामुळे हा आरोपी सराईत स्वरुपाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कारवाईत अटक केलेल्या आरोपीला शिरूर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ३ जुन २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे.

विषारी दारुच्या पार्श्वभुमीवर कारवाईला महत्त्व…
पुणे जिल्ह्यात अलीकडेच विषारी दारुमुळे मृत्यूच्या घटना समोर आल्याने पोलिसांकडून अवैध दारु निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत निमगाव भोगी येथील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, ग्रामीण भागात सुरु असलेल्या हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांचा दबाव वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित कारवाई पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, अजित पवार पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर, पोलिस शिपाई किशोर शिवणकर, अमोल रासकर, तसेच चालक पोलिस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

नशेचा नवा ट्रेंड! शिरूर तालुक्यात पाईप चिकटविण्याच्या लिक्विडचा नशेसाठी वापर…

शिरूर पोलिसांची अवैध दारु व्यवसायावर धडक मोहीम; तीन गुन्हे दाखल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

8 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

8 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

8 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

1 दिवस ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

1 दिवस ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

1 दिवस ago