महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचा विश्वासघात महायुती सरकारला महाग पडेल; विजय वडेट्टीवार

नागपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांना अपात्र ठरवून महायुती सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी केला. या महिलांच्या नाराजीचा फटका आगामी काळात महायुती सरकारला बसणार असल्याची टीकाही त्यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीत मतांसाठी लाडकी बहिण योजनेचा वापर करण्यात आला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर सरकारनेच या महिलांना वाऱ्यावर सोडले आहे. सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवून सरकारने आपली जबाबदारी झटकली असून, यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपतींना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.

“काँग्रेसमुक्त भारत”चा नारा देणारी भाजप आता “काँग्रेसयुक्त” होत चालली असल्याचा उपरोधिक टोला वडेट्टीवार यांनी लगावला. अनेक मुख्यमंत्री, आमदार आणि आता विधान परिषदेचे उमेदवारही काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची मूळ ओळख बदलत असल्याची टीका त्यांनी केली.

विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस सर्व जागांवर ताकदीने लढणार असल्याचे सांगत त्यांनी पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. भाजपकडे संख्याबळ असूनही उमेदवारांची घोषणा करण्यास झालेला विलंब त्यांच्या मनातील भीती दर्शवितो, असा दावा त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास घटना दुरुस्तीला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ५० टक्क्यांवरील आरक्षणाच्या मर्यादेचा आधार घेत ओबीसी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सरकारच्या ओबीसीविरोधी भूमिकेचे द्योतक असल्याचेही त्यांनी 🥰म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago