Shikrapur Police Station
शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत पत्नीचा खून केल्यानंतर नवरा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना घडली आहे. सविता मनोहर कांबळे (वय ३८ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीरामनगर ता. मूर्तिजापूर जि.अकोला) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोहर नागोराव कांबळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे हे पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना अचानक एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या तळेगाव ढमढेरे येथील घरी घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. घराला बाहेरुन कडी होती. पोलिसांनी कडी उघडून आतमध्ये पाहणी केली. त्यावेळी सदर व्यक्तीची पत्नी सविता कांबळे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजारीच लोखंडी हातोडी पडल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने सविता कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र सविता मनोहर कांबळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत राजेश मनोहर कांबळे (वय १९ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोहर नागोराव कांबळे (वय ५३ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता.शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीरामनगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहेत.
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…
शिरूर तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोन आरोपी ताब्यात
शिरूर! तुझा ट्रॅक्टर चोरला आहे, तुला काय करायचे ते कर…
शिरूर ड्रग्ज प्रकरण! पोलिस हवालदार गुजर व शिंदे बंधूंचे काळ्या धंद्याचे जाळे होणार उघड…
शिरूर तालुक्यात ‘तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो’, असे म्हणत गजाने केला हल्ला…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…