महाराष्ट्र

राज्यसभेसाठी भाजपचं ‘धक्कातंत्र’ पुन्हा अ‍ॅक्टिव्ह? महाराष्ट्रातील ७ जागांवर मोठी राजकीय हालचाल

मुंबई: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार असून त्यापैकी ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजप यावेळी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

२ एप्रिल २०२६ रोजी खालील सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे 

Sharad Pawar (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

Fauzia Khan (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

Rajani Patil (काँग्रेस)

Priyanka Chaturvedi (शिवसेना – उबाठा)

Ramdas Athawale (रिपाई – आठवले)

Dhairyasheel Patil (भाजप)

Bhagwat Karad (भाजप)

रामदास आठवले सध्या केंद्रात मंत्री असून दलित चेहरा म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या चार जागा जवळपास निश्चित मानल्या जात असल्याने उर्वरित नावांवर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

निष्ठावंतांना संधी? चर्चेत ही नावं

भाजपकडून यंदा संघटननिष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. त्यात Vinod Tawde, Vinay Sahasrabuddhe आणि Sunil Deodhar यांची नावं आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

२०१९ मध्ये विनोद तावडे यांचं विधानसभा तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र त्यांनी कोणतीही नाराजी न दर्शवता पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. २०१९ पासून ते संसदीय राजकारणात नसल्याने यंदा त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘धक्कातंत्रा’ची परंपरा कायम राहणार?

भाजपने याआधीही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये अनपेक्षित नावांना संधी देत ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. त्यामुळे यंदाही शेवटच्या क्षणी एखादं अनपेक्षित नाव जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी असल्याने जातीय किंवा प्रादेशिक समीकरणांपेक्षा संघटननिष्ठा आणि राजकीय रणनीतीला प्राधान्य दिलं जाईल, अशी चर्चा आहे.आता भाजपकडून अंतिम निर्णय कधी आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

6 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

6 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

6 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

23 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

23 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

23 तास ago