क्राईम

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अंमली पदार्थ विक्रीत युवक जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर मोठी कारवाई करत एम.डी. (मॅफेडॉन) विक्रीसाठी आलेल्या तरुणास जेरबंद केले आहे. आरोपीकडून अंमली पदार्थासह स्कुटी असा एकूण ७२,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शिरूर परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शिरूर नगरपरिषदेपुढे सापळा रचला. त्यावेळी संशयित युवक अॅक्टीव्हा स्कुटी (क्र. एमएच १२ एमटी ६८३९) वरून आला असता त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव पवन सागर भंडारे (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरूर) असे निष्पन्न झाले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपीकडून २ ग्रॅम ८० मिली पांढऱ्या रंगाचा मॅफेडॉन (एम.डी.) अंमली पदार्थ प्लॅस्टिकच्या पुडीत मिळून आला. त्यासह स्कुटी जप्त करण्यात आली असून, सदर मुद्देमालाची किंमत ७२,००० इतकी आहे.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ६४७/२०२५, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिपक करांडे करीत आहेत.

दरम्यान, या कारवाईत पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. तर कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक करांडे, पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटींग, डी.बी. पथकाचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नितीन सुद्रीक तसेच पोलिस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाऊसाहेब ठोसरे, अजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शिरूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी पोलिसांच्या सतर्कतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त: शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पैश्यासाठी खून! शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद

शिरूर तालुक्यात फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांचा छापा

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना ‘मलिदा’ मिळाला का…

शिरूर पोलिसांकडून गुटखा तस्करीवर धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

20 मिनिटे ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

3 तास ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

18 तास ago

महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…

23 तास ago

बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली सूट दिली आहे का? फडणवीसांनी त्याला मुंबईत आणून चौकशी करावी

हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…

23 तास ago

‘SIR रद्द करा, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा द्या!’ युवक काँग्रेसचा एल्गार; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…

23 तास ago