न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे ओढे, नाले, पाझर तलाव तुडुंब भरुन वाहू लागल्याने अनेक ठिकाणी छोटे पुल पाण्याखाली गेले. तर या पाऊसाने कांदा तसेच बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
शिरुर तालुक्याच्या सर्वच भागात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु झाला. सलग काही तास हा पाऊस पडत होता. त्यामुळे ढगफुटी तर झाली नाही ना…? अशी भिती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शिरुरच्या पुर्व भागातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी-भोसेवाडी हा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना डेअरीवर दुध घालण्यासाठी पाण्यातुन दोरीच्या साह्याने चालत वाहत्या पाण्यात जीव धोक्यात घालत वाट काढावी लागली.
तर मुसळधार पाऊसाने मोटेवाडी येथील पाझर तलाव तुडुंब भरल्यामुळे या तलावाच्या खालच्या बाजूस असलेला निमोणे-शिरुर रस्त्यावरील छोटा पुल पाण्याखाली गेल्याने अनेक दुचाकी-चारचाकी वाहन चालकांना नाईलाजाने स्वतःच्या गाड्या अंदाजे ३ ते ४ फुट खोल वाहत असलेल्या पाण्यात घालाव्या लागल्या. त्यामुळे या रस्त्यावर पुल उभारावा अशी आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली असल्याचे मोटेवाडीचे सरपंच लालासो कोल्हे यांनी केली आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …