क्राईम

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रामलिंग गावाजवळ शिरूर-रामलिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे.

१ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजता शिरूर-रामलिंग रोडवर हॉटेल शिवशाही मिसळ समोर हा अपघात घडला. स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-12/HM-6971) वरून जाणारा चालक प्रशांत परमेश्वर जाधव (रा. रामलिंग, मूळ रा. भडगाव, जि. जळगाव) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित समोरून येणाऱ्या नितीन दौलत जाधव (वय ३५, रा. रामलिंग) यांच्या पल्सर मोटारसायकलला (क्र. MH-12/DU-6526) जबर धडक दिली होती. या अपघातात नितीन जाधव यांना हातापायासह पोटावर गंभीर दुखापत झाली. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर आरोपी प्रशांत जाधव घटनास्थळावरून फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या अपघाताची फिर्याद शिरूर पोलिस ठाण्यात १४ सप्टेबर रोजी मृताचा भाऊ रविंद्र दौलत जाधव यांनी दिली असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पो. हवा. उमेश भगत हे करत आहेत. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त

अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; करंदी गावच्या हद्दीत ३ ते ४ वाहनांना कंटेनरची धडक

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

शिरुरमध्ये अज्ञात पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago