क्राईम

शिरूर तालुक्यात मारहाण करून गाडीची काच फोडून लाखो रुपये लंपास…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-निमोणे रस्त्यावरील चव्हाणवाडी हद्दीत ओंकार सचिन गवळी (वय २०, रा. पाचर्णेमळा शिरूर) याची रविवारी (ता. १०) रात्री ८.४५च्या सुमारास अज्ञातने कार अडवून रॉडने गाडीची काच फोडून मारहाण केली. गाडीच्या डीकीतील तब्बल १,७२,००० रुपये लंपास केले आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

रविवारी रात्री ०८.४५ वा. च्या सुमारास चव्हाणवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीत शिरूर -निमोणे रोडवर ओंकार गवळी हा त्याच्या ताब्यातील टोयोटा कंपनीची इटॉस कार नंबर एम. एच .४६ एम ७९५४ हि चालवित घेवुन इनामगाव येथे जात होते. यावेळी पाठीमागुन एक लाल रंगाच्या मोटार सायकल चालकाने त्याच्या कारला कट मारला त्यावेळी ओंकार त्याला “काय रे काय झाले” असे म्हणाला. त्यावेळी तो काहीएक न बोलता पुढे निघुन गेला. ओंकार तुकाईफाटा पास करून २०० मिटर अंतरावर आल्यानंतर त्याच अज्ञातने (अंदाजे वय २५ ते ३०) तोडाला मास्क बांधलेला, अंगात लाल रंगाचा शर्ट घालून रोडला उभा होता. त्याने ओंकारच्या कारच्या काचेवर लोखंडी रॉडने मारून कारची काच फोडून नुकसान केले.

ओंकार कारमधुन बाहेर आला. त्यावेळी अज्ञाताने मानेला धरले व हे बंद करून टाक असे म्हणुन ओंकारच्या पाठीवरती कशानेतरी मारले. त्यावेळी ओंकार त्याला हिसका मारून जवळच्या शेतात पळून गेला असता त्याने कारच्या ड्राव्हर मध्ये ठेवलेले १,७२,००० रुपये घेवुन गेला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

कारेगाव येथील वेश्या व्यवसायावरील कारवाई नंतर सगळीकडे एकच चर्चा ‘गंगाधर हि शक्तीमान है’

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

शिरूर तालुक्यात लघूशंकेसाठी घराबाहेर पडणे पडले महागात…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

7 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

7 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

10 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

11 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

11 तास ago