shirur-tehsildar

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत चोरटयांनी जवळपास दोनशेच्या वर विद्युत रोहीत्र चोरुन नेले असून महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. विद्युत रोहीत्र चोरीला गेल्यावर जास्त विदयुत रोहीत्र चोरीला गेल्याने नवीन विद्युत रोहित्र देताना महावितरण कडून महीनोमहीने वेळ लागत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी महागड्या केबल वारंवार चोरीला जात असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे.

चोऱ्यांना आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मोटार व केबलला विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार करून सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या मागणीनुसार पोलिस प्रशासन, महसुल प्रशासण, महावितरण यांची शिरूर येथे २९ रोजी शिरुर तहसिल कार्यालयात ऊपविभागीय आधिकारी हरेश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या असून ग्रामसुरक्षा दल, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वाघमोडे, शिरुर चे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, शिरूर महावितरणचे ऊप कार्यकारी अभियंता सुमित जाधव, शिक्रापूर ऊप कार्यकारीअभियंता नितीन महाजन, परीसरातील सरपंच, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होत होते.

वाळुंज यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या मोटार व केबलला विमा संरक्षण मिळण्यासाठीचा प्रस्ताव वरीष्ठांमार्फत शासण दरबारी पाठवणार आहे. महावितरणचे कर्मचारी, ग्रामसुरक्षा दल यांना बरोबर घेऊन पोलिस रात्रीची गस्त घालून लवकरच आरोपी गजाआड करतील. या पुढे या चोऱ्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाला सुचणा देण्यात आल्या आहेत.
– हरेश सुळ, उपविभागीय आधिकारी शिरुर, पुणे

कारेगाव येथील वेश्या व्यवसायास भाड्याने खोली देणारा मालक अजित इटनर याच्यावर गुन्हा दाखल

कारेगाव येथील वेश्या व्यवसायावरील कारवाई नंतर सगळीकडे एकच चर्चा ‘गंगाधर हि शक्तीमान है’

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिक्रापुर मध्ये शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूच्या 1226 झाडांची लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक