मुख्य बातम्या

शिरुरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी कारवाई केली असुन याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिपक शंकरलाल उपाध्याय (रा. सुशीला पार्क,शिरुर) विमल बागवान टेलोत (वय 42) (रा. पिंडवाल ता. आसपुर जि. डोंगरपुर, राजस्थान) सध्या रा. महाराज लॉज,शिरुर ता. शिरुर, जि. पुणे आणि अशोक गंगाधर उबाळे (वय 50) रा. साई श्रेयांस लॉज, शिरुर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिरुर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज येथे वेश्याव्यवसाय चालु असल्याबाबत शिरुर पोलिसांना माहिती मिळाल्याने दि 12 मार्च 2024 रोजी दुपारी 5 च्या सुमारास महाराजा लॉजवर छापा टाकला असता दिपक शंकरलाल उपाध्याय याच्या सांगण्यावरुन विमल भगवान टिलोत (वय ४२) वर्ष हा मुलींसह वेश्या व्यवसाय करताना सापडल्याने शिरुर पोलिसांनी त्यांच्या विरोधात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली आहे.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे पोलीस हवालदार परशुराम सांगळे, नितीन सुद्रिक, राहुल भवर, महिला पोलीस प्रतिभा देशमुख, अर्चना यादव यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.

 

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय जोमात…?

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी नुकतीच रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील तीन मजली इमारतीत चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली आहे. त्यानंतर काही दिवसातच शिरुर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ मध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय जोमात चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याना ऊत…

शिरूर शहरासह परीसरातील अनेक लॉजवर खुलेआम व्येशा व्यवसाय सुरू असून लॉज भाड्याने देणाऱ्या मुळ मालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. शेट्टी लोकांनी या भागात लॉज भाड्याने घेऊन खुलेआम हा व्यवसाय सुरू केला आहे. शिरूर पोलिस खरच या भाड्याने जागा देणाऱ्या मुळ मालकांवर कारवाई करणार का…? हा मोठा प्रश्न आहे. या व्यवसायाबरोबर तालुक्यात गुटखा विक्री, गांजा विक्री मोठया प्रमाणात होत असून याची पाळेमुळे ऊखडून टाकण्यात शिरूर पोलिस यशस्वी होणार का ? तसेच रांजणगाव, शिरूर परिसरातील वाईन्स दुकानातून दारूचा महापूर वाहत असून हा महापूर रोखण्यात रांजणगाव, शिरूर पोलिस यशस्वी होणार का…? असा प्रश्न सामान्य नागरीक विचारत आहे.

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago