बिहार: बिहारची राजधानी पाटणा येथे खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पाटणा उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ महिला वकील इंदिरा लक्ष्मी (वय ६०) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला.
ही घटना कदम कुआं पोलीस ठाणे हद्दीतील राजेंद्र नगर, रोड क्रमांक २ येथे घडली. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
एकट्याच राहत होत्या
इंदिरा लक्ष्मी या पाटणा उच्च न्यायालय तसेच दिवाणी न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या. त्या कायदेशीर क्षेत्रात सक्रिय होत्या. त्या घरात एकट्याच राहत होत्या, तर त्यांचे पती रांची येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
बुधवारी त्यांचा मृतदेह घरात आढळल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक (एफएसएल) दाखल झाले असून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नसून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे न्यायालयीन वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…