३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण; प्राथमिक, माध्यमिकसह विविध प्रवर्गांतील शिक्षकांचा समावेश
मुंबई: राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारां’साठी राज्यातील विविध प्रवर्गांतील एकूण १२३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार शासनाने ही निवड जाहीर केली असून, येत्या ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने सेवा करत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. निवड झालेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक प्रवर्गातील ३८, माध्यमिक प्रवर्गातील ३९, तर आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १९ प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.
याशिवाय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका प्रवर्गातील आठ, विशेष शिक्षक (कला) प्रवर्गातील आठ, विशेष शिक्षक (क्रीडा) प्रवर्गातील आठ, दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एक शिक्षक, तसेच स्काऊट व गाईड प्रवर्गातील प्रत्येकी एक अशा दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
१९६२ पासून पुरस्कार योजना
महाराष्ट्रात राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ पासून पुरस्काराच्या निकषांमध्ये सुधारणा करून या योजनेला ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ असे नाव देण्यात आले. या पुरस्कारांतर्गत १० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. तसेच राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना संबंधित तरतुदीनुसार एक लाख रुपयांची ठोक रक्कम देण्यात येते.
३ डिसेंबरला मुंबईत पुरस्कार वितरण
राज्य निवड समितीची २५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली. आता ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे निवड झालेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रवर्गनिहाय निवड झालेल्या सर्व १२३ शिक्षकांची नावे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप…
पर्स्लेन (पोर्टुलाका ओलेरेसिया) ही एक पानेदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते…
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…
इंगळे कुटुंबासोबत भाकरी खात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या; कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मेहकर : दुष्काळग्रस्त…
शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; बालाजी मोटे यांच्या गोपनीय माहितीने आरोपी जाळ्यात! शिरूर (अरुणकुमार…
शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था…