क्राईम

कात्रजमध्ये भीषण अपघात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

पुणे : कात्रज परिसरात अपघातांची मालिका सुरू असतानाच शनिवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकल्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव अंश भाऊरंग कांबळे (वय ३, रा. अंजनीनगर, कात्रज) असे आहे.या प्रकरणी ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५०, रा. निलंगा, लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कात्रज व परिसरातील वाढते अपघात कधी थांबणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच रस्ता निसरडा असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात तातडीने वेगमर्यादा लागू करणे, अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणे आणि रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago