महाराष्ट्र

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना त्यांनी दोन विचारधारांतील फरक स्पष्ट केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या स्वप्नातील भारत वेगळा असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर संस्थांवर ताबा मिळवण्याचा आरोप केला.

“सर्व यंत्रणांवर कब्जा”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला सत्ता व संपत्ती हवी असून निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका आणि इतर सरकारी यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. देशात हिंसा, द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

“संविधानानुसार देश चालला पाहिजे”

काँग्रेसची विचारधारा सत्तेचे विकेंद्रीकरण, सर्वसमावेशकता आणि संविधाननिष्ठ शासनाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून ते शाहू, फुले, आंबेडकर, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारित भारत घडवण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

नेहरूंचा दाखला

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात जवाहरलाल नेहरू यांनी सहा बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिल्याचा दाखला देत सर्व विचारधारांना सामावून घेण्याची परंपरा काँग्रेसची असल्याचे त्यांनी नमूद केले. एका सामान्य महिलेने नेहरूंची कॉलर पकडून प्रश्न विचारल्याची आठवण सांगत, आजच्या भारतात सरकारविरोधात बोलण्याची भीतीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

“डरो मत”चा संदेश

आपले नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या “डरो मत” संदेशाचा उल्लेख करत, कोणत्याही दबावाला न घाबरता विचारांची लढाई लढा, असे आवाहन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेस संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी पक्ष संपणार नाही, असा दावा त्यांनी केला.या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, आरजे संग्राम खोपडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago