महाराष्ट्र

दादांच्या जाण्याने आजीचे अश्रू थांबत नाहीत, शरद पवारही अस्वस्थ; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

एक महिना पूर्ण: अजित पवारांच्या आठवणीत युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली होती. आजही त्यांच्या आठवणीने कुटुंबीय आणि समर्थक भावूक होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला,” असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, “आजही तुमच्या नसण्याची जाणीव होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, ‘मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!’ असा भास होतो. सतत वाटतं, आता तुमची गाठ पडेल… पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ?”

युगेंद्र पवार यांनी कुटुंबातील भावनिक अवस्थेचाही उल्लेख केला. “आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. बाबा इतके भावूक झाले आहेत की त्यांचा बांध केव्हाही फुटतो. ‘दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…’ असे म्हणत ते व्यथित झाले,” असे त्यांनी नमूद केले.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्यशैलीची आणि ठाम नेतृत्वाची आठवण अनेकजण काढत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

3 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

5 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

16 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

17 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

20 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

20 तास ago