sharad pawar dilip walse patil
मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. यामुळे अनेकांचे लक्ष आजच्या सभेकडे लागले आहे.
दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जायचे. पण अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. पुढे दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. यानंतर मतदार संघामधूनच दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
शरद पवार हे आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या भाषणाकडे लक्ष अनेकांचे लक्ष लागले आहे. आज थेट वळसे पाटील यांच्या मतदारसंघात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी शड्डू ठोकलेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पवार आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांच्या मानसपुत्राचा कोणत्या शब्दात समाचार घेतात, याकडे केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.
मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधणार आहेत. कर्जत जामखेडला इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याच्या तयारीत रोहित पवार आहेत. असा आरोप करत वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत भाजपशी घरोबा केला होता. त्या आरोपाला रोहित पवार प्रतिउत्तर देतात का? हे पाहणे ही महत्वाचे असेल.
दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…
ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…
शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेदवदारांची नावे पाहा…
शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…
शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत
दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…
दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…
वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…