क्राईम

अख्खं राज्य हादरल! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये महिला पेशंटवर बलात्कार

ड्रायव्हर आणि टेक्निशियनच्या कृत्याने संतापाची लाट

मुंबई: होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात दाखल झालेल्या एक मुलीवर बलात्कार झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. होमगार्डच्या भरती प्रक्रियेदरम्यान मैदानात धावत असताना चक्कर आल्याने मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. मात्र, अ‍ॅम्ब्युलन्स चालक आणि टेक्निशियनमधील राक्षस जिवंत झाले आणि चक्क अ‍ॅम्ब्युलन्समध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडितेने तक्रार दाखल केली. 26 वर्षीय मुलीवर होमगार्ड उमेदवारावर चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना बिहारमधील बोधगया येथे घडली, येथील बीएमपी 3 मध्ये होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, भरती प्रक्रियेदरम्यान मुलीची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला ताबडतोब मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेत अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित मुलीने सांगितले की, अ‍ॅम्ब्युलन्समध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित मुलगी ही इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर बोधगया पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. एसएसपी आनंद कुमार यांनी लगेचच कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलीये. पीडितेने आपल्या जबाबात दोनपेक्षा अधिक जण असल्याचा दावा केलाय. यामुळे याप्रकरणी अजून काही आरोपींना अटक केली जाऊ शकती. तात्काळ या प्रकरणात एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली.

एसएसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, घटनेच्या दोन तासांमध्येच अ‍ॅम्ब्युलन्स चालक विनय कुमार आणि टेक्निशियन अजित कुमार यांना अटक करण्यात आली. पिडितेनेच रुग्णालयात दाखल केल्यानंतर आपल्यासोबत नेमके काय घडले हे डॉक्टरांना सांगितले. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. काही महत्वाच्या गोष्टी तपासात पुढे आल्या. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अ‍ॅम्ब्युलन्समध्ये नेमके कोण कोण होते, याचा तपास घेतला जातोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago