क्राईम

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीसह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीत घडली असून, या प्रकरणी खोपोली येथे वास्तव्यास असलेले एकनाथ जालिंदर इचके (वय ५६) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इचके हे मूळचे इचकेवाडी (कवठे येमाई) येथील रहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत इचकेवाडीमधील घर बंद होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला.

घरातील कपाट फोडून १ लाख २६ हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, तसेच २५ हजारांचे चांदीचे दागिने आणि भांडी असा एकूण २ लाख २१ हजारांचा ऐवज चोरून नेला.या चोरीची माहिती मिळताच शिरुर पोलिस स्टेशन अकींत टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. सदरचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरोधात नोंदवण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

दरम्यान, गावातील बंद घरे लक्ष करून चोरटे आपली संधी साधत असल्याने नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आणि परगावी राहणाऱ्यांनी शक्यतो शेजाऱ्यांना पूर्वसूचना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago