क्राईम

दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक

१८ गुन्हे उघडकीस २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत

शिरुर (तेजस फडके): मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग तसेच रानातील एकांटी वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे आणि घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ६ ते पथके तयार करून वेगवेगळया टिकाणी रवाना केलेली होती. पुणे ग्रामीण आणि अहमदनगर येथे दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्याला अटक करुन १८ गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडुन २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने तयार केलेल्या पथकामार्फत समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यापूर्वी अजय उल्हास्था काळे (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासातून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरुन आरोपी गणेश सुरेश भोसले (वय २८ वर्षे रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि बीड) सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यात चोरीस गेलेल्या मालापैकी ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक बदाम, चोरलेली यूनिकॉर्न गाडी, घडयाळ, ब्रेसलेट असा ऐवज मिळून आला.

तसेच त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने वेळोवेळी दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरी करुन चोरलेले सोन्याचे दागिने हे किरण भाऊसाहेब बेद्रे या सराफास विक्री केल्याची माहीती सांगितलेली असून त्यावरुन किरण भाऊसाहेब बेद्रे, (वय ३३) मु.पो.बाळुंज, ता. नगर, जि. अहमदनगर या सोनारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी १७ लाख ६४ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान १) अजय उल्हास्या काळे, (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) २) गणेश सुरेश भोसले (वय २८) रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ३) पावल्या ऊर्फ देवा कैलास काळे, ४) तुषार ऊर्फ विशाल कैलास काळे, ५) शरद कैलास काळे, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यांचा या गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चोरलेले सोने हे किरण भाऊसाहेब बेद्रे या सोनार याला विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्हयातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सदर आरोपीनी शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, नारायणगाव, दौंड, बेलवंडी या पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोडे तसेच चोऱ्या केल्या आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे, सहायक फौजदार तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापकीर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे, चंद्रकांत जाधव, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, पोलिस नाईक बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, सहायक फौजदार काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, पोलिस कॉन्स्टेबल दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, निखील रावडे, श्रीमंत होनमाने यांनी केलेली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास नितीन अतकरे हे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

18 मिनिटे ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

19 मिनिटे ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

26 मिनिटे ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

29 मिनिटे ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

32 मिनिटे ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

9 तास ago