पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील पेठ क्र. 06 (मोशी) येथील भूखंड क्र. 87 ते 104, गृहयोजना क्र. 03 मधील विकसीत केलेल्या 14 रो हाऊसेसचे 80 वर्षांच्या कालावधीकरीता भाडेपट्ट्याने वाटप करणेसाठी ई-लिलाव प्रक्रीया राबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठी हवेली तालुक्यातील मौजे मोशी, पेठ क्र. 06 येथील भूखंड क्र. 87 ते 104, गृहयोजना क्र. 03 मधील विकसीत केलेल्या 14 रो हाऊसेसचे दि. 31/08/2023 रोजी होणाऱ्या ई-लिलावाद्वारे भाडेपट्ट्याने वाटप करण्यात येणार आहे. सदर 14 रो हाऊसेसचे स्थळावर 18°39’12.87″N, 73°50’27.01″E या Latitudeव Longitude नुसार गुगल मॅपद्वारे पोहचता येईल.
उपरोक्त रो हाऊसच्या भूखंडाचे क्षेत्र कमीत कमी 190.86 चौ.मी. व जास्तीत जास्त 251.53 चौ.मी. आहे. तसेच रो हाऊसची कमीत कमी विक्री किंमत रु. 1,11,37,320/- व जास्तीत जास्त विक्री किंमत रु. 1,26,06,748/- इतकी आहे. व सदर रो हाऊसेससाठी एकुण विक्री किंमतीच्या 2% अनामत रक्कम व फॅार्म फीची रक्कम रु. 5,000/- असणार आहे. सदर रो हाऊसेससाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन दि. 11/07/2023 रोजी सायं. 5.00 वा. पासून ते दि. 10/08/2023 रोजी सायं. 5.00 वा. पर्यंत नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल.
सदर लिलावाची संपूर्ण प्रकीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सर्व लिलाव प्रक्रीयेची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण लिलाव प्रक्रीया https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन होईल. त्यासाठी इच्छुक व्यक्तींनी लिलाव प्रक्रीयेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…