क्राईम

भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस, पहा नक्की काय केल…

नवी दिल्ली: माजी IAS अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर त्यांची मोलकरीण सुनीताने गंभीर आरोप केला आहे. सुनीताने सांगितलं की, सीमा पात्रा यांनी तिच्यावर लोखंडी वस्तूने वार करुन तिचे दात तोडले आहेत. गरम तव्याने तिच्या शरीराच्या अनेक भागावर चटके दिले, ज्याच्या खुणा शरीरावर अजूनही आहेत. तिने सांगितलं की मॅडमचा मुलगा आयुष्मानने तिला या सगळ्यातून वाचवलं. आज ती त्याच्यामुळेच जिवंत आहे.

सुनीताच्या म्हणण्यानुसार तिला एका खोलीत बंद केलं गेलं होतं. तिला कित्येक दिवस खायला प्यायलाही दिलं नाही, त्यामुळे ती खूप अशक्त झाली. सुनीताने सांगितलं की, तिला व्यवस्थित उभा राहता येत नसतानाही तिला काम करायला लावत असे, पोलिसांनी सुटका केल्यानंतर सुनीतावर सध्या रिम्समध्ये उपचार सुरु आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा तिला रुग्णालयात आणलं तेव्हा ती खूप अशक्त होती, हळूहळू तिची शारीरिक स्थिती सुधारेल.

अर्गोराचे एसएचओ विनोद कुमार यांनी सांगितलं की, पीडिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. ती बरी झाल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवला जाईल. तिच्या वक्तव्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अद्यापही सुरु आहे.

‘पेट्रोल संपलंय, लिफ्ट द्याल का’? महिलेनं आधी मदत घेतली, मग वृद्धाला ब्लॅकमेल करत केलं धक्कादायक कृत्य काँग्रेस आमदार दीपिका सिंह पांडे यांनी ट्विटद्वारे भाजपला घेरलं आहे. भाजपच्या बड्या नेत्यांना टॅग करत त्यांनी लिहिलं की, ‘धिक्कार आहे तुमच्या नेत्या सीमा पात्रा यांचा, ज्यांनी ओलीस ठेवलेल्या महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिची कहाणी शब्दात वर्णन करता येणार नाही. पावर आणि पैशाच्या गर्वात या मुलीचे दात तोडले, तिच्या अंगावर गरम तव्याचे चटके दिले.

 

अपमानास्पद वागणूक दिली. स्मृती इराणी कुठे आहेत, भाजपचा महिला मोर्चा का झोपला आहे? एक गरीब आदिवासी मुलगी तुमच्यासाठी मुलगी नाही का? रस्त्यावर उतरा आणि या महिलेसाठी कठोर शिक्षेची मागणी करा. महिला आयोग या महिलेच्या विरोधात कारवाई का करत नाही?’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

11 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

12 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago