क्राईम

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर…

किरकटवाडी: पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मैत्रीचा बहाना करत करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारातून सदर मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या घरासमोर गॅरेजमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन तरुणाने मुलीला मैत्रीच्या बहाण्याने फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दहावीत शिकणारी मुलगी या अल्पवयीन तरुणाने वारंवार केलेल्या लैंगिक अत्याचारातून चार महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीच्या आईला संशय आल्याने तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने याबाबत आईला माहिती दिली. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला यामुळे धक्का बसला.

मुलीची प्रकृती खालावल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते यांनी रुग्णालयात जाऊन सदर मुलीच्या आईचा जबाब घेतला व त्यावरुन फिर्याद दाखल करुन घेण्यात आली आहे. तातडीने संबंधित अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

11 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

12 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

13 तास ago