क्राईम

शिरुरच्या बोऱ्हाडे मळ्यात दरवाजाचे कुलूप उचकटून चोरी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील बोऱ्हाडे मळा येथे राहणारे सचिन उदार हे (दि. १७) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप उचकटलेले तसेच घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे सचिन यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील २५ हजार रुपये रोख रक्कम तसेच ३ तोळे सोन्याचे दागिने असा अंदाजे १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

unique international school

याबाबत सचिन सुभाष उदार (वय ३३) रा. बोऱ्हाडे मळा शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

2 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

2 दिवस ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून…

2 दिवस ago

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

3 दिवस ago

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

5 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

6 दिवस ago