क्राईम

शिरुर तालुक्यात ठेकेदाराला खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीमध्ये ठेकेदाराला दमदाटी करत काम बंद करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समीर हरगुडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

unique international school

सणसवाडी (ता. शिरुर) येथील फुजीफिल्म सेरीकॉल इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये राकेश मराठे यांचा ठेका आहे, मराठे यांचे कंपनीमध्ये काम सुरु असताना समीर हरगुडे हा तेथे आला त्याने तुमची कामे बंद करा, तुम्ही येथे काम करायचे नाही, तुमचे सगळे साहित्य घेऊन जा, तुम्हाला येथे काम करायचे असेल तर मला १५ हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून धमकी दिली, त्यांनतर पुन्हा समीर याने सायंकाळच्या सुमारास राकेश मराठे यांना फोनवर धमकी दिली.

याबाबत रमेश पुंजाराम कोंजरे (वय ६३) रा. राजीवनगर लेन नंबर ३ विमानगर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी समीर हरगुडे (पूर्ण नाव माहित नाही) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago