पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे हा अपघात घडला. ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमाटणे फाटा परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो आला होता. चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला होता.
मात्र टेम्पो उतारावर उभा करण्यात आला होता. चालकाने वाहनाचा हँडब्रेक लावण्यास विसरल्याने तो टेम्पोतून खाली उतरल्यावर अचानक वाहन मागे सरकू लागले. त्यावेळी जवळच उभी असलेली ज्ञानेश्वरी मुऱ्हे हिला टेम्पोचा धक्का बसला आणि ती खाली पडली.
टेम्पोमध्ये गॅस सिलेंडर भरलेले असल्याने वाहन वेगाने मागे सरकले आणि ज्ञानेश्वरी टेम्पोच्या चाकाखाली सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.टनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे सोमाटणे फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…