क्राईम

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’; चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नवी मुंबईतील वाशी येथील धक्कादायक घटना, आरोपी अटकेत

मुंबई: नवी मुंबईतील वाशी परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली असून वाशी पोलिसांनी आरोपी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.

वॉर्डबॉयचा डॉक्टर म्हणून वावर

आरोपी संदेश पाष्टे हा मूळचा मानखुर्द येथील रहिवासी असून तो अंधेरीतील एका नर्सिंग होममध्ये केवळ वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. मात्र मानखुर्द आणि आसपासच्या परिसरात तो स्वतःची ओळख ‘डॉक्टर’ म्हणून करून रुग्णांवर उपचार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

नेमकी घटना काय?

प्रचिती भुवड हिला हार्मोनल आजार असल्याने तिच्या वडिलांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला उपचारासाठी घरी बोलावले होते. 5 फेब्रुवारी रोजी पाष्टेने प्रचितीला घरी येऊन पहिले इंजेक्शन दिले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडू लागल्याने त्याने दुसरे इंजेक्शन टोचले. मात्र दुसऱ्या इंजेक्शननंतर काही वेळातच प्रचितीची तब्येत अधिकच खालावली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या उपचारासाठी कुटुंबाकडून तब्बल 15 हजार रुपये फी घेतली होती. प्रत्यक्षात अशा इंजेक्शनची बाजारातील किंमत केवळ 500 ते 1000 रुपयांदरम्यान असल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीला बेड्या

मुलीचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी आरोपी संदेश पाष्टेला अटक केली.प्रचितीला नेमकी कोणती औषधे आणि इंजेक्शन देण्यात आली, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलिसांचे आवाहन

नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पदवी, नोंदणी आणि पात्रतेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन वाशी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

14 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

18 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

18 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

18 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

19 तास ago