मुलगा-सून भाजपचे, मुली ZP मध्ये विजयी
पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील राजकीय समीकरणांनी राज्याच्या राजकारणात नवा ‘पठारे पॅटर्न’ तयार केला आहे. एकाच घरातून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी निवडून आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
बापूसाहेब पठारे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता.
मात्र, त्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे यांनी भाजपची वाट धरत नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत दोघेही भाजपचे नगरसेवक झाले.
आता जिल्हा परिषद निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांच्या दोन्ही मुलींनीही विजय मिळवला आहे. त्यांची मुलगी रुपाली अमोल झेंडे या पुरंदर तालुक्यातील ‘दिवे गराडे’ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या आहेत. रुपाली झेंडे या आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत.
तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत विजयी झाल्या आहेत. दिपाली गव्हाणे सध्या डिंग्रजवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या असून त्यांचे पती राहुल गव्हाणे हे उद्योजक आहेत.
थोडक्यात, एकाच घरात आमदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य — तेही वेगवेगळ्या पक्षांचे — अशी दुर्मिळ राजकीय परिस्थिती पाहायला मिळत आहे. बापूसाहेब पठारे राष्ट्रवादीत, मुलगा-सून भाजपमध्ये आणि दोन्ही मुली राष्ट्रवादी व भाजपकडून विजयी झाल्याने ‘पठारे पॅटर्न’ची चर्चा सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…