क्राईम

जावयाच्या मदतीने आईनेच दिली पोटच्या मुलाची सुपारी; डीएनए चाचणीत उघडकीस आला धक्कादायक खून प्रकरण

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईनेच आपल्या जावयाच्या मदतीने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शहानवाजपूर शिवारातील एका विहिरीत २६ जानेवारी रोजी अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. काही नागरिकांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह बुडावा म्हणून त्याला दगडांनी भरलेल्या पोत्यासोबत दोरीने बांधण्यात आले होते. मात्र मृतदेह फुगल्याने तो पाण्यावर तरंगू लागला आणि हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहणी केली असता हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र मृताची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. मृतदेहावरील कपड्यांवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सुरुवातीला नातेवाईकांनी ओळख नाकारली.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांवर लक्ष केंद्रित केले. तपासात उघड झाले की, मृत व्यक्ती सतत घरात वाद घालत होता आणि आईला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून आईने आपल्या जावई कमलसिंग सिंगल याच्याकडे व्यथा मांडली. त्यानंतर मुलाला संपवण्याचा कट रचण्यात आला. या कटात कमलसिंगचा मित्र गोरख अहिरे याला सहभागी करून त्याला ३० हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले.
प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डीएनए चाचणी. पोलिसांनी संशयित आईचा डीएनए नमुना फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला. अहवालात मृतदेहाचा डीएनए आईशी जुळल्याचे निष्पन्न झाले. यानंतर चौकशीत आईने गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणी संबंधित तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रक्ताच्या नात्यातील या क्रूर हत्येमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

35 मिनिटे ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

7 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

10 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

20 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

21 तास ago