क्राईम

‘तुझे अनैतिक संबंध आहेत, मला तलाक दे’; पुण्यात भर चौकात तरूणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलाक का देत नाही म्हणत २२ वर्षीय तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. सुदैवाने ता या हल्ल्यातून बचावली. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. थेरगाव येथील एम. एम. चौकात हा सर्व प्रकार घडला.
एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना थेरगाव येथील एम. एम. चौकात शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सलमान रमजान शेख (वय २९, रा. रोहन वाइन्समागे, विजयनगर, काळेवाडी) आणि हुजेफा आबेद शेख (वय २७, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, मूळ रा. वाहेगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी नाणेकर चाळ, भारतनगर, पिंपरी येथील २२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिने याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामावर असताना आरोपी दुचाकीवरून घटनास्थळी आले. आरोपी सलमानने ‘तलाक का देत नाहीस,’ या कारणावरून फिर्यादीचे कामावरील सहकाऱ्यांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार केले. प्रतिकार करताना तिच्या डोक्यावर, गालावर आणि कानामागेही वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

14 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago