मुख्य बातम्या

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत ‘वरुन किर्तन आतुन तमाशा’ शाळेपासुन हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्षण हिच खरी प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते. मात्र शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत शिक्षणाच्या मंदिरांच्या सावलीतच अवैध धंद्यांचे सावट गडद होत आहे. तळेगाव-शिक्रापुर रोडवरील हॉटेलच्या नावाखाली राजरोस सुरु असलेला जुगार अड्डा स्थानिक पालक आणि सुजाण नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे.

या जुगार अड्ड्याच्या हाकेच्या अंतरावर तब्बल सहा उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. सकाळी ते दुपारपर्यंत शेकडो विद्यार्थी या परिसरातून शाळेकडे जाताना-येताना दिसतात. अशा ठिकाणी जुगार अड्ड्यांचे अस्तित्व हि अत्यंत गंभीर आणि धोकादायक बाब मानली जात असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला काळी छाया पडत असल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत.

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापुर, तळेगाव ढमढेरे या गावात अनेक ठिकाणी सर्रास जुगार अड्डे सुरु आहेत. विशेष म्हणजे बाहेर ‘हॉटेलचा बोर्ड आणि आत मात्र जुगाराचा अड्डा’ असा प्रकार सुरु असुन “जुगार अड्डे जोमात अन प्रशासन मात्र कोमात” अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

तळेगाव ढमढेरे येथे महाविद्यालयांच्या हाकेच्या अंतरावरच जुगाराचा अड्डा असल्यामुळे या वातावरणाचा थेट फटका शालेय परिसरावर आणि विद्यार्थ्यांवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण असून “विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करत असताना शाळेजवळच अवैध जुगार सुरु असेल, तर त्यांच्या भविष्याचे काय होणार…? असा प्रश्न पालक विचारत आहेत.

या गंभीर परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक संघटनांकडून नोंदवले जात आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल तसेच उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी स्वतः लक्ष घालून या अड्ड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी समाजाची असते. मात्र, शाळांच्या शेजारीच चालणारे जुगार अड्डे जर रोखले नाहीत, तर येणाऱ्या पिढीच्या घडणाऱ्या संस्कारांवर गंडांतर येण्याची भीती नाकारता येत नाही. याबाबत मी स्वतः शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केलेली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे अध्यक्ष सतिश पाचंगे यांनी सांगितले.

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत जर काही गैरप्रकार चालत असतील तर निश्चितच त्यावर कारवाई केली जाईल. तक्रारदाराने असे अवैध धंदे जिथे चालु असतील तिथली माहिती आम्हाला दयावी. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल.

दिपरतन गायकवाड (पोलिस निरीक्षक)

शिक्रापुर पोलिस स्टेशन 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

14 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago