cow
भोपाळ (मध्य प्रदेश) : एका गायीने अनोख्या वासराला जन्म दिला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. या वासराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वासराबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्येही उत्सुक्ता वाढली.
रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज येथील गोरखा गावातील शेतकरी नथुलाल शिल्पकर यांच्या गायीने सिंहासारख्या वासराला जन्म दिला आहे. नागरिकांना हा प्रकार कळताच ते तातडीने पाहण्यासाठी पोहोचले. पण दुर्दैवाने गायीने जन्म दिलेल्या वासराचा अर्ध्या तासातच मृत्यू झाला आहे.
वासराला पाहून नागरिकांनी निसर्गाचा चमत्कारच म्हटले आहे. तर पशुवैद्यकांनी याला गर्भाशयाचा दोष म्हटले आहे. या घटनेनंतर गायीची तपासणी करण्यात आली, गाय पूर्णपणे निरोगी आहे. काही तज्ज्ञ याला संशोधनाचा विषय म्हणत आहेत.
दरम्यान, भोपाळमध्ये अनोखा मासा सापडला होता याआधी राजधानी भोपाळमधून असेच विचित्र प्रकरण समोर आले होते. तलावात एक असा विचित्र मासा सापडला, जो देशात कुठेच पाहायला मिळत नाही. वास्तविक, भोपाळमधील खानूगाव येथे राहणारा अनस खान खानगावला लागून असलेल्या तलावाच्या काठावर मासेमारीसाठी गेला होता. यादरम्यान त्याच्या हुकमध्ये एक मासा अडकला, जो इतर माशांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ज्याचे तोंड मगरीसारखे आणि बाकीचे शरीर माशासारखे दिसत होते. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी या माशाचे नाव अॅलिगेटर गार असे ठेवले. हा मासा अमेरिकेत आढळतो असे तज्ज्ञांनी सांगितले होते.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…