ambulance
नवी दिल्ली : एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिका रस्त्यातील खड्ड्यात जोरात आदळली आणि मृत व्यक्ती जिवंत झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.
दर्शन सिंह बराड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दर्शन सिंह यांचे कुटुंबिय मृतदेह घेऊन पटियालाहून कर्नालला त्यांच्या घरी घेऊन निघाले होते. त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. गावात यासाठीची तयारीही झाली होती. मात्र, मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे चाक कॅथल ढांडजवळ एका खड्ड्यात अडकले आणि जोरात दणका बसला.
रुग्णवाहिकेत दर्शन सिंह यांच्या मृतदेहाजवळ त्यांचा नातू बसला होता. रुग्णवाहिकेला दणका बसल्यानंतर दर्शन सिंह यांचा हात हलवू लागला. शिवाय, हृदयाची धडधड जाणवताच रुग्णवाहिकेच्या चालकाला जवळच्या रुग्णलयात नेण्यास सांगितले. डॉक्टरांनी दर्शन सिंह यांना कर्नालमधील रुग्णलयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. दर्शन सिंह यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान, या घटनेला कुटुंबिय चमत्कार मानत असून आता ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.
मानसिक आरोग्य उत्तम कसे राखावे यासाठी जाणून घ्या ५ फायदेशीर टिप्स
आमदाराची मुलगी म्हणाली, पप्पा, मी आंतरजातीय विवाह करणार पण तो गरीब आहे…
आश्चर्य! एक महिना अगोदरच मृत्यूची केलेली भविष्यवाणी ठरली तंतोतंत…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…