देश

Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…

नवी दिल्ली : जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी समजली जाते. वाटेत एखादा कोब्रा साप दिसला, तरी कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे.

कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र, तरीही काही जण न घाबरता या सापाला अगदी सहज पकडतात किंवा त्याच्यासोबत खेळताना दिसतात. पण, हे चुकीचे आहे. एकाने असाच काहीसा करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका रस्त्यावर कोब्रा फणा काढून उभा आहे. त्याच्या समोर दोन जण गाडीतून उतरत उभे आहेत. त्यापैकी एकाच्या हातात रायफल आहे. त्या शस्त्राच्या साहाय्याने तो दोनदा सापावर गोळीबार करतो. पण, सापाला गोळी लागत नाही. यामुळे संतापलेल्या कोब्राने दोन्ही जणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघही घाबरून ओरडताना दिसतात आणि इथेच हा व्हिडिओ संपतो.

संबंधित व्हिडिओ अवघा 10 सेकंदांचा आहे. Instant Karma नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसणारे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे- कोब्रासोबत लढताना बंदुकीचा काही उपयोग नाही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

19 मिनिटे ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

15 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

15 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

15 तास ago