थेट गावातून

करंदीत अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

शिक्रापुर (शेरखान शेख) करंदी (ता.शिरुर) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि मंदिराच्या वर्धापनदिना निमित्त अखंड हरीनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला असून आठवडाभर सुरु असलेल्या या सप्ताहास नागरिकांसह महिलांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले तर श्रीकृष्ण जन्म दरम्यान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या बालचमूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

करंदी (दि १२) ऑगस्ट पासून हरीनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आठवडाभर काकड आरती, पारायण, प्रवचन तसेच कीर्तनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असताना अनुक्रमे ह. भ. प. मारुती महाराज ढोकले, राहुल महाराज पाटील, दिगंबर महाराज ढोकले, बबन महाराज साकोरे, शिवाजी महाराज दरेकर, गुलाबराव डाळिंबकर सर, कु. प्राजक्ता झेंडे यांचे प्रवचन तर ह. भ. प. गणेश महाराज फरताळे, दिगंबर महाराज जाधव, सुप्रियाताई साठे – ठाकूर, उल्हास महाराज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, शंकर महाराज शिंदे, नवनाथ महाराज माशिरे यांचे कीर्तन संपन्न झाले तर वैभव महाराज ढोकले यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.

सलग आठवडाभर सुरु असलेल्या या सप्ताहामुळे गावामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते तर दररोज ग्रामस्थांसह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता, या सप्ताहवेळी दररोज पोलीस पाटील वंदना महेश साबळे यांच्याकडून कीर्तनकार यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले. श्रीकृष्ण जन्म दरम्यान गावातील गोपी ढोकले या बालकाने श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर सप्ताह संपन्न होण्यासाठी सर्व ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

11 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

15 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

15 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

15 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

15 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

16 तास ago