क्राईम

शिक्रापूर चाकण रस्त्यावर अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने महादेव भगत हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ एन एन ८८१८ या दुचाकीहून चाललेला असताना समोरून आलेल्या एम एच १४ डी एम ०७९६ या टेम्पोची महादेवला जोरदार धडक असून अपघात झाला असुन या अपघातात महादेवला जोरात मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक राकेश मळेकर, अंबादास थोरे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करत महादेव भगतचा मृतदेह शवविच्छेदन साठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला.

सदर घटनेमध्ये महादेव परमेश्वर भगत (वय ३७) रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. फरा. आडमापूर ता.चिखली जि. बुलढाणा याचा मृत्यू झाला असून याबाबत सुरज सुरेशराव अडसळू (वय ३७) रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टेम्पोचालक शिदोबा साहेबराव दगडे (वय ४८) रा. इंद्रायणीनगर,भोसरी,पुणे मूळ रा. दौंडज ता. पुरंदर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago