sevadham dahihandi
शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात गोकुळाअष्टमी निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा केला. यावेळी एका विद्यार्थ्याने श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती.
पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांच्या माध्यमातून विशेष मुलांच्या अनोख्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, श्रावण या विद्यार्थ्याने श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती. श्रावणच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर श्रीकृष्णासह त्याचे गोकुळातील सहकारी देखील विविध वेषभुषेसह दहिहंडी उत्सवात सहभागी झाले होते.
सर्व विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. आयोजित करण्यात आलेली दहिहंडी फुग्यांसह हारफुलांनी सजवून दहिहंडी मध्ये चॉकलेटस ठेवल्याने सर्व विद्यार्थी आतुर होते. श्रीकृष्णाच्या वेषभूषेतील श्रावणने दहिहंडी फोडताच सर्वांनी जल्लोष केला. सदर दहिहंडी उत्सवाकरिता शिक्षिका शुभांगी पायमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करत आभार मानले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…